संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलिसांकडून कारवाईचा बडगा…

2

अत्यावश्यक सेवा सुरू; गर्दी न करण्याचे पोलिसांचे आवाहन…

संचारबंदीचे आदेश लागू असतानाचं शहरात बेधडक फीरणार्‍यांवर आज सावंतवाडी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तुमच्यासह कुंटूबांची काळजी घ्या,अन्यथा कारवाईला सामोरे जा,असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
दरम्यान आज येथिल भाजी मंडईच्या ठीकाणी गर्दी करणार्‍या लोकांना त्या ठीकाणी रोखले जात आहे.त्याठी पोलिसांसह पालिका कर्मचारी सुध्दा कार्यरत आहेत. तर दुसरीकडे सकाळी नेहमी प्रमाणे दुकाने उघडण्याचा प्रयत्न करणार्‍या दुकानदारांना पोलिसांना दुकाने पुन्हा बंद करण्याच्या सुचना केल्या, तसेच शहराकडे येणार्‍या गाड्या येथिल उद्यान परिसरात रोखण्यात आल्या, अत्यावश्यक असल्यासचं त्यांना बाजारात पाठविण्यात आले,अन्यथा त्यांना परत पाठविण्यात येत होते.यावेळी पोलिस निरिक्षक शशिकांत खोत,पोलिस उप निरिक्षक अमित गोते आदींसह सर्व पोलीस कर्मचारी कार्यरत होते.

9

4