Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकणकवलीत दुसर्‍या दिवशीही बाजारपेठा बंद...

कणकवलीत दुसर्‍या दिवशीही बाजारपेठा बंद…

सुपरबाजार आणि भाजी विक्रेत्यांनाही दुकाने बंद करण्याचे निर्देश

कणकवली, ता.२३: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कणकवली शहरात आज दुसर्‍या दिवशीही सर्वच दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली. तर गर्दी टाळण्यासाठी सुपरबाजार आणि भाजी विक्रेत्यांनाही दुकाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे कणकवली शहरात आज दिवसभर शुकशुकाट होता.
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत कणकवलीकरांनी रविवारी कर्फ्यू पाळला होता. तर आज सोमवारी शहरातील व्यापारी बांधवांनी स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद ठेवली. आजच्या बंद मध्ये सर्व प्रकरणी किराणा दुकाने, हॉटेल, उपाहारगृहे, सुवर्णपेढ्या, स्टेशनरी, पानटपर्‍या आदी सर्वच दुकाने उत्स्फुर्तपणे बंद ठेवण्यात आली. अत्यावश्यक सेवा असल्याने मेडिकल दुकाने सुरू होती. तर बाजारपेठ बंद असल्याने कणकवली नगरपंचायतीतर्फे शहरात निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. दरम्यान उद्या मंगळवारी भरणारा आठवडा बाजार देखील रद्द करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments