कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे घेतला निर्णय…
सावंतवाडी,ता.२३: करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचप्रमाणे आता सावंतवाडी तालुक्यातील सोनूर्ली गावच्या श्री देवी माऊली देवीचे दर्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी पुढील शासकीय आदेश मिळेपर्यंत दर्शनासाठी येऊ नये.
तसेच जो पर्यंत शासकीय आदेश येत नाही, तो पर्यंत माऊली देवीचे दर्शन भाविकांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती देवस्थान कमिटीचे पदाधिकारी बाळा गावकर यांनी दिली आहे. फक्त पुजाऱ्यांना आत प्रवेश मिळणार आहे.