‘कोरोना’तही एलईडीवाले तुपाशी…

2

मालवण बंदरात उतरविण्यात येत आहे पर्ससीनची मासळी ; मत्स्यव्यवसाय विभागाचे दुर्लक्ष…

मालवण, ता. २३ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सतर्कता बाळगली जात असताना एलईडीच्या साह्याने पर्ससीन नेट मासेमारी करणाऱ्यांना अद्यापही मोकळीक दिली जात आहे. दोन दिवसांपूर्वी तहसीलदारांनी थेट मालवण बंदर येथे जाऊन गर्दी करणारी ट्रॉलर्सची मासळी लिलाव प्रक्रिया रोखली होती. परंतु त्यानंतरही एलईडी पर्ससीनवाले रात्री ९ वाजल्यापासून बिनधास्तपणे मालवण बंदरात मासळी उतरवित आहेत त्यांना का रोखले जात नाही हा सवाल पारंपरिक मच्छीमारांकडून केला जात आहे. आज संचारबंदी लागू असतानाही मालवण बंदरात पर्ससीनची मासळी उतरवली जात आहे. पण एलईडीवाल्यांना कुणीच का रोखत नाहीय असा सवाल रापण व गिलनेटधारक पारंपरिक मच्छीमारांकडून होत आहे.

1

4