सावंतवाडीत अतिहौशी युवकांवर “पोकळ बांबूचे फटके”…

2

पोलीस आक्रमक ; संचारबंदी न जुमानणाऱ्या युवकांवर कारवाई…

सावंतवाडी.ता,२४ : शासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर सुद्धा शहरात बिनदिक्कत फिरणाऱ्या युवकांच्या विरोधात सावंतवाडी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वारंवार सूचना देऊन सुद्धा काही लोकांकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे पोलिसांनी अखेर “पोकळ बांबूचे फटके” देण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.एकीकडे कोरोना व्हायरसचे संकट जगासह देशावर असताना शासनाकडून योग्य ती उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.त्यामुळे लोक एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून संचारबंदी करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. परंतु या निर्णयाला न जुमानता अनेक अतिहौशी युवक गंमत म्हणून शहरात फिरताना दिसत आहे.त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

5

4