सावंतवाडीत जीवनावश्यक वस्तूंची मोफत “घरपोच डिलिव्हरी” देणार…

2

निशांत तोरसकर यांचा पुढाकार; इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन…

सावंतवाडी.ता,२४: कोरोनाच्या काळात शहरातील दुकानावर औषध,किराणामाल, बेकरी आदी गोष्टींसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी येथील कार्यकर्ते निशांत तोरसकर यांनी आपल्या मित्र मंडळाच्या माध्यमातून घरपोच मोफत डिलिव्हरी देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यादृष्टीने त्यांनी इच्छुकांनी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे याद असे म्हटले आहे की कोरोना व्हायरस या राष्ट्रीय आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष निशांत तोरसकर यांच्या वतीने सावंतवाडी शहरातील सर्व भाजीपाला विक्रेते, औषध दुकानदार, किराणामाल दुकानदार तसेच बेकरी व्यावसायिक व हॉटेल व्यावसायिक, दूध वितरक यांना आवाहन करण्यात येते की या विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी गर्दी टाळणे अत्यावश्यक आहे.त्या अनुषंगाने आपण विक्री करत असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची मोफत घरपोच करण्याची व्यवस्था करावी.ही घरपोच व्यवस्था करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास त्यासाठी आमच्या मंडळाचे स्वयंसेवक आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी तत्पर आहेत.तसेच हे स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या सावंतवाडी शहरातील युवक व युवतींनी त्याचप्रमाणे व्यावसायिकांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन निशांत तोरसकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.सूरज कारीवडेकर ७७४३९४०५०१,समिरण कारीवडेकर ९१७५०८६६८९,निशांत ९४२२५९६०५०/७३५०९३३३१

10

4