सावंतवाडी तहसलिदारांचे आवाहनःसामानाची यादी देवून खरेदी करण्याच्या सुचना…
सावंतवाडी.ता,२४: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासनाकडुन जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीत गर्दी टाळण्यासाठी येथिल ग्राहकांनी दुकानदारांकडे आपल्या सामानाची यादी द्यावी जेणेकरुन बाजारात गर्दी होणार नाही,असे आवाहन आज येथे सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे.
दरम्यान ज्या सेवाभावी संस्था कींवा युवकांना लोकांना मदत करायची आहे.त्यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सुध्दा त्यांनी केले आहे.याबाबत श्री म्हात्रे यांनी संपर्क साधून ब्रेकिंग मालवणीला आपली प्रतिकीया दिली.ते म्हणाले संचारबंदी असताना केवळ जिवनावश्यक वस्तू नेण्यासाठी बाजारात गर्दी होत आहे. मात्र त्यासाठी प्रशासनाकडुन सहकार्य केले जाणार आहे.मात्र त्या ठीकाणी गर्दी होवू नये यासाठी खबरदारी घेण्यात यावी यासाठी सामानाची चिठ्ठी लिहून द्या असे आवाहन श्री म्हात्रे यांनी केली आहे.