मालवण शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराघरांत होणार सर्व्हे…

2

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सर्व्हेसाठी पालिकेच्या १९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती…

मालवण, ता. २४ : राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करून खंड २, ३, ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी सर्व्हे करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पालिका प्रशासनाने १९ कर्मचार्‍यांची यासाठी नियुक्ती केली आहे. या सर्व कर्मचार्‍यांनी शहरातील घराघरात जात दिलेल्या वॉर्डमध्ये जात आवश्यक माहिती गोळा करून केलेल्या कामाचा अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी दिल्या आहेत.

4

4