कोरोना व्हायरसच्या विषाणूंपासून बचाव करण्यासाठी मास्क वाटप…

2

शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांच्यावतीने खांबाळे येथे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना मास्क वाटप…

वैभववाडी.ता,२४: कोरोना व्हायरसच्या विषाणूंपासून बचाव करण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्यावतीने खांबाळे गावातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना व गावातील काही ग्रामस्थांना खांबाळे ग्रामपंचायत येथे मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, सरपंच सारिका सुतार, ग्रामसेवक जी. डी. कोकणी, आरोग्यसेविका एस. ए. बोडेकर, अंगणवाडी सेविका धनश्री देसाई, पूजा लवू पवार, पूजा परशुराम गुरव तसेच आशास्वयंसेविका शामली देसाई, प्राची पवार व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

3

4