बांद्यात २४ तास सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी सज्ज…

2

प्राथमिक आरोग्य केंद्रातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय…

बांदा.ता,२४: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सर्व खासगी डॉक्टर २४ तास सेवा देण्यासाठी उपलब्ध असतील. नुकतीच बांदा येथे बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
सध्य बरेचजण छोट्या  छोट्या कारणांसाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी गर्दी करत आहेत. प्रशासन गर्दी टाळण्याचे आवाहन करत आहे. यासाठी शक्यतो घरीच थांबा. वैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टरना फोन करून सल्ला घेऊन घरगुती उपाय करा. अत्यावश्यक असेल तरच रुग्णालयात या असे आवाहन यावेळी डॉक्टरांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी बैठकीला सरपंच अक्रम खान, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. दिलीप सावंत, डॉ. तुषार कासकर, डॉ. एन. वाय. नाईक, डॉ. संजय सावळ, डॉ. भालचंद्र कोकाटे, डॉ. केरकर आदी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी, पोलीस, ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे तत्पर आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.

10

4