देशात लॉकडाऊन झाले तरी कोणी “पॅनिक” होऊ नये…

2

सावंतवाडी तहसीलदार; जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी शासन प्रयत्नशील…

सावंतवाडी ता.२४: देशात “लॉकडाऊन” झाले असले तरी लोकांनी काळजी करू नये,जीवनावश्यक वस्तू शासनाकडून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,मेडिकल सुरू राहतील,त्यामुळे कोणीही “पॅनिक” होण्याची गरज नाही.कोणी दुकानावर गर्दी करू नये,असे आवाहन सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आज येथे केले.पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर श्री.म्हात्रे यांनी ब्रेकींग मालवणीला माहीती दिली.
ते म्हणाले, लॉकडाऊन झाले असले तरी कोणी काळजी करण्याची गरज नाही,आम्ही लोकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.त्यासाठी उद्या नियोजन करण्यात येणार आहे.यात कोणाचे नुकसान होणार नाही,याची काळजी घेतली जाणार आहे.जीवनावश्यक वस्तू उदाहरणार्थ डाळ,तांदूळ, तेल आदी देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतील, कोणी ही काळजी करण्याची गरज नाही आहे.

6

4