गर्दीवर नियंत्रणासाठी मालवणात मेडिकलसह अन्य दुकानांसमोर काढले पांढरे वर्तुळ, चौकोन…

2

प्रशासनाची अनोखी शक्कल ; व्यावसायिकांकडून कार्यवाही…

मालवण, ता. २५ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र त्यानंतरही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने अनोखी शक्कल लढविली असून मेडिकल, किराणा तसेच अन्य दुकानाच्या समोर पांढऱ्या पट्ट्यांचे वर्तुळ, चौकोन आखण्याचे आदेश दुकानदारांना दिले. त्यानुसार संबंधितांनी त्याची कार्यवाही केली आहे.
संचारबंदी काळात सकाळी जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. सातत्याने प्रशासनाकडून आवाहन करूनही नागरिकांकडून याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने अनोखी शक्कल लढविली आहे. प्रशासनाने शहरातील सर्व मेडिकल, किराणा, दूध, भाजीपाला विक्रेत्यांना आपल्या दुकानासमोर पांढऱ्या रंगाचे वर्तुळ, चौकोन काढण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार शहरातील सर्व संबंधित व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर वर्तुळ, चौकोन काढण्याची कार्यवाही केली आहे. त्यामुळे आता नागरिकांना जीवनावश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी या वर्तुळ, चौकोनातच उभे राहावे लागणार आहे. यामुळे होणाऱ्या गर्दीवरही नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.

6

4