सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८० हून अधिक युवक-युवती गोव्यात अडकले…

2

लॉकडाऊनचा फटका; आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या,प्रशासनाकडे केली मागणी…

सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.२६: गोवा-फोंडा,वेर्णे येथील इंडस्ट्रीज एरिया मध्ये काम करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ८० हुन अधिक युवक-युवती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे गोव्यात अडकले आहेत.यात सावंतवाडी,दोडामार्ग,कुडाळ वेंगुर्ला आणि देवगड येथिल कामगारांचा समावेश आहे.आमच्याकडचे पैसे,धान्य आणि मुख्यत्वे गॅस संपला आहे.तसेच काम बंद असल्यामुळे पगार सुध्दा मिळणार नाही.त्यामुळे आम्हाला जिल्ह्यात येवू द्या,तसे गोवा शासनाला कळवा,अशी आर्त विनवणी त्यांनी ब्रेकिंग मालवणीच्या माध्यमातून केली आहे.
याबाबतची माहिती त्या ठीकाणी अडकलेल्या युवकांनी ब्रेकिंग मालवणीशी संपर्क साधून दिली.त्यांच्या म्हणण्यानुसार गोवा- कुंडई फोंडा तसेच वेर्णा परिसरात असलेल्या फार्मासिटीकल कंपन्यासह आजूबाजूच्या परिसरात असलेल्या कंपन्यामध्ये आम्ही काम करीत आहोत.सदयस्थितीत आमच्या संपर्कात कीमान ८० जण आहेत.त्यांनी दिलेल्या माहीतीनुसार प्रत्येकांच्या भाड्याच्या खोलीत असलेले जिवनावश्यक सामान आणि गॅस संपला आहे.तर दुसरीकडे पैसे सुध्दा कमी आहेत.काहींच्या म्हणण्यानुसार एटीएम मध्ये पैसे आहेत.परंतू त्या ठीकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त असल्यामुळे आम्हाला कोण बाहेर पडू देत नाही.बाहेर पडल्यानंतर पोलिसांकडुन फटके दिले जातात,त्यामुळे आता घरी गेल्याशिवाय पर्याय नाही,परिसरात कोणाशी ओळख नाही.त्यामुळे काही वस्तूसह जिवनावश्यक वस्स्तू मागू शकत नाही.तसेच काम बंद असल्यामुळे आणि आम्ही कंत्राटी पध्दतीवर काम करणारे असल्यामुळे आता पगार मिळणार नाही.त्यामुळे आम्हाला सिधुदूर्ग जिल्हा प्रशासनाने याठीकाणावरुन सिधुदूर्गात न्यावे,अशी त्यांनी विनंती केली आहे.

2

4