आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून केल्या सूचना…
कणकवली, ता.२६ : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कणकवली तहसील कार्यालयात आज भेट देऊन तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा व संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून अधिकाऱयांना आवश्यक सूचना केल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क असून वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचना पाळून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर जे पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ खलिफे, तालुका आरोग्य अधिकारी डॉसंजय पोळ, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ एस एस पाटील आदी उपस्थित होते.