“त्या” युवक-युवतींना सिंधुदुर्गात आणण्यासाठी भाजपचा पुढाकार….

2

ब्रेकिंग मालवणी टीमकडून प्रयत्न सुरू; सिंधुदुर्गासह गोवा प्रशासनाचा हिरवा कंदील…

सावंतवाडी/अमोल टेंबकर ता.२६: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासनाकडुन जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात गोव्यात अडकलेर्ल्या सिधुदूर्ग जिल्ह्यातील युवक-युवतींना पुन्हा जिल्ह्याकडे आणण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी पुढाकार घेतला आहे .दरम्यान याबाबतचे वृत्त ब्रेकींग मालवणीने प्रसिध्द करताच गोव्यातील अनेकांनी संपर्क केला.त्यानुसार ब्रेकींग मालवणी टिमच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
या पार्श्वभूमिवर युवक युवती अडकल्याचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.त्यांनी गोवा भाजपाचे प्रांतपाल सदानंद तानावडे यांच्यासमवेत सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांच्याशी चर्चा सुरु केली आहे.प्रांतपाल तानावडे यांनी दिलेल्या सुचनेनुसार त्यांनी गोव्याच्या सिमेपर्यत सोडण्याची तयारी दर्शविली आहे.मात्र अद्याप पर्यत निर्णय झालेला नाही.चर्चा सुरू आहे,परंतू राजन तेली यांच्या म्हणण्यानुसार जे कोणी जिल्ह्यात येणार आहेत.त्यांना आरोग्य प्रशासनाच्या सुचनेप्रमाणे कॉरन्टाईन मध्ये राहणे बंधनकारक राहणार आहे.त्यामुळे त्याची तयारी संबधितांनी दाखवावी.

13

4