गोव्यात कामा निमित्त असलेल्या फक्त मुलांमुलींना प्रवेश मिळण्याची शक्यता…

2

राजन तेलींची माहीती ;सरसकट नाही,दोन राज्यातील निर्णय असल्यामुळे बोलणी सुरू…

सावंतवाडी.ता,२६:  कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गोव्यात अडकलेल्या फक्त एकट्या राहणार्‍या युवक युवतींना या सिंधुदूर्गात प्रवेश देण्यासाठी भाजपाच्या वरिष्ट नेत्यांशी बोलणी सुरू आहेत.मात्र हे करताना सरसकट सगळ्यांना प्रवेश दिला जाणार नाही,अशी भूमिका प्रशासनाकडुन घेण्यात येणार असल्यामुळे एकटे असलेल्यांनी त्यात विशेषतः युवतींना जिल्ह्यात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.अशी माहीती भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी दिली.दरम्यान हा निर्णय दोन राज्यातील आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा झाल्याशिवाय योग्य तो निर्णय घेतला जाणार नाही. त्यामुळे लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन ब्रेकींग मालवणी टिमच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
गोवा वेर्णा कुुंडइृ फोंडा परिसरात काम करणारे युवक आणी युवती त्या ठीकाणी अडकल्या आहेत.त्यांनी आवाहन केल्यानुसार आम्ही याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले.मात्र या ठीकाणी काही कुंटूबासमवेत राहणार्‍या अन्य लोकांनी सुध्दा आपल्याला जिल्ह्यात यायचे आहे.असे आमच्या टिमकडे सांगितले आहे.
परंतू संबधितांना जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न करणारे माजी आमदार राजन तेली यांच्या म्हणण्यानुसार ज्या युवक युवतींना खरोखरच गरज आहे. त्यांनाच या ठीकाणी जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.मात्र सरसकट कुंटूबांसोबत राहणार्‍या लोकांनी त्याच ठीकाणी रहावे असे त्यांनी आवाहन केले आहे.
दरम्यान हा निर्णय ह्या दोन राज्यामधील वरिष्ट नेत्यांशी आणी अधिकार्‍यांशी चर्चा करून घेण्यात येणार असल्यामुळे सर्वानी सहकार्य करणे अपेक्षित आहे.त्यासाठी ज्यांना खरोखरच गरज आहे.त्यांना परत आणण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चद्रकांतदादा पाटील यांच्याशी आपण चर्चा करीत आहे झालेल्या निर्णयाबद्दल सायंकाळी उशिरा पर्यत योग्य ती माहीती दिली जाईल,तर दुसरीकडे गोवा शासनाने तयारी दर्शविली आहे. मात्र साथरोगाच्या आजारा दरम्यान बाहेरून येणार्‍यांना कॉरन्टाईन करण्याच्या सक्त सुचना असल्यामुळे प्रशासनाशी बोलणे सुरू आहे असे तेेली म्हणाले.

6

4