दोन राज्याचा विषय असल्यामुळे थोडे सबुरीने घ्या….!

2

राजन तेलींचे आवाहन;गोव्यात अडकलेल्या जिल्हावासियांची संख्या दीड हजाराहून अधिक…

सावंतवाडी,ता.२६:  गोव्यात अडकलेल्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील लोकांना महाराष्ट्राच्या सीमेवर सोडण्यासंदर्भात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे.परंतु हा दोन राज्याचा विषय असल्यामुळे आणि सिंधुदुर्गात कोरोनाचा रुग्ण आढळला असल्याने, येथील प्रशासकीय यंत्रणा त्या ठीकाणी व्यस्त आहे.त्यामुळे अडकलेल्या लोकांनी सबूरीने घ्यावे.त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,अशी माहीती भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी दिली.दरम्यान आम्ही कोणतेही भावनिक राजकारण करीत नाही.जी मुले अडकली आहेत,ती इंडस्ट्रीयल ऐरीयात ज्या ठीकाणी कोणी राहत नाही,अशा ठीकाणी आहेत.त्यात महीलांची संख्या जास्त आहे.त्यामुळे एक पालक म्हणून तसेच आमच्या जिल्ह्यातील मुले म्हणून आम्ही त्यांना या ठीकाणी आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.मात्र तत्पुर्वी आरोग्य प्रशासनाने त्यांची तपासणी करावी.गरज असल्यास त्यांना क्वाँरन्टाईन करावे,अशी सुध्दा आमची मागणी आहे, असे श्री.तेली म्हणाले.
जिल्ह्यातील ८०/९० मुले अडकल्याची माहीती ब्रेकिंग मालवणीच्या माध्यमातून मिळाल्यानंतर,आम्ही त्यांना आणण्यासाठी प्रयत्न केला.मात्र तेथील काही कुंटूबासमवेत राहत असलेल्या अनेक लोकांनी आपण येण्याची तयारी दर्शविली, ही संख्या सुमारे दीड ते दोन हजाराच्या घरात आहे.आणि इतक्या लोकांना तपासणी शिवाय जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही.तर त्यांची तपासणी निश्चीतच केली जाणार आहे.मात्र आज जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोरोनाचा रुग्ण मिळाल्याने जिल्ह्यातच अडकल्यामुळेे त्यांच्याशी चर्चा करणे शक्य झालेले नाही.तरीही या मुलांना पुन्हा जिल्ह्यात आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे,माजी महसुलमंत्री चद्रकांत पाटील यांनी प्रशासनाच्या वरिष्ट अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे.परंतू हा दोन राज्यामधील निर्णय आहे.त्यामुळे तात्काळ यावर तोडगा काढणे अशक्य आहे,त्यामुळे अडकलेल्या संबधितांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी थोडे सबुरीने घ्यावे, योग्य निर्णय लवकरच घेतला जाईल.असेही श्री.तेली यांनी यावेळी सांगितले.

2

4