सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक म्हणून पुढे यावे…

2

अमित सामंत; तालुक्यातील तहसील कार्यालयात नाव नोंदणी करण्याचे आवाहन…

कुडाळ ता.२७: कोरोना व्हायरसमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे.त्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन स्वयंसेवक म्हणून पुढे यावे ,व आपापल्या भागातील जनतेला जमेल तशी मदत करावी,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले.
श्री.सामंत यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना व्हायरस मुळे देशात गंभीर समस्या निर्माण झालेल्या कठीण मदत करण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले आहे.त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील जनतेला सहकार्य करणे आवश्यक आहे.तसेच प्रत्येक तालुकानिहाय याप्रसंगी कोणाला स्वयंसेवक म्हणून काम करावयाचे आहे,त्यांनी तहसीलदार कार्यालयात नांव नोंदणी करावी,असे त्यांनी म्हटले आहे.

1

4