मेंगलोर एक्सप्रेसमधून आलेल्या ‘त्या’ चौघांची प्रकृती ठीक…

2

एस- ३ बोगीतील त्या दोघांना जिल्हा रुग्णालयात पाठविले, अन्य दोघांना होम क्वारंटाइन ; वैद्यकिय अधिकारी डॉ. पाटील यांची माहिती…

मालवण, ता. २७ : मेंगलोर एक्स्प्रेसच्या एस ३, एस १ या बोगीमधून प्रवास करत तालुक्यात आलेल्या चारही व्यक्तींना आज येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले. गेल्या नऊ दिवसांत त्यांच्यात कोरोना संदर्भातील कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे एस १ बोगीतील दोघांना होम क्वारंटाइन करून घरी पाठविण्यात आले आहे. तर एस ३ बोगीतील दोघांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.
कणकवली मधील प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हा प्रवासी ज्या मेंगलोर एक्सप्रेसने प्रवास करत होता. त्याच एस ३ बोगीतील दोन तर एस १ या बोगीतील दोन असे चार प्रवासी तालुक्यातील एका गावात नऊ दिवसांपूर्वी दाखल झाले होते. याची माहिती संबंधित ग्रामपंचायतीस मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित चारही जणांना आज येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. नऊ दिवसानंतरही त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यामुळे एस १ या बोगीतील दोघांना होम क्वारंटाइन करून घरी पाठविण्यात आले तर एस ३ बोगीतील दोघांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

4

4