उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत ; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरे यांचे वेधले लक्ष…
मुंबई,ता.२७:* उच्चशिक्षणासाठी युरोपमध्ये गेलेले देशातील ३७ विद्यार्थी लॉकडाऊनमुळे त्याच ठिकाणी अडकले आहेत.त्यात मुंबईतील ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.दरम्यान त्यांना त्याठिकाणी जीवनावश्यक वस्तू तसेच योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली आहे.त्यामुळे त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी व विदेश मंत्री महोदयांशी चर्चा करून संबंधित विद्यार्थ्यांना याठिकाणी आणण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत,अशी मागणी श्री.सामंत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.