Sunday, December 14, 2025
Google search engine
HomeUncategorizedमुंबई अडकलेल्या चाकरमान्यांना गावात येण्याची संधी द्या...

मुंबई अडकलेल्या चाकरमान्यांना गावात येण्याची संधी द्या…

राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांची शासनाकडे मागणी…

रत्नागिरी ता.२७: मुंबईत दहा बाय दहाच्या खोलीत राहणार्‍या चाकरमान्यांना कोकणात येण्याची परवानगी द्या,अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी शासनाकडे केली आहे.याबाबत त्यांनी आज पत्र दिले आहे.त्यात असे नमुद करण्यात आले आहे की,जगात कोरोनाचे संकट आहे.अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मुंबईत अनेक जण कोकणात राहणारे कामगार अडकले आहेत. त्यात विशेष करुन दहा बाय दहाच्या रुम मध्ये त्यांना रहावे लागत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे त्या चाकरमान्यांची मागणी लक्षात घेता शासनाने त्यांना याठीकाणी कोकणात येण्याची परवानगी द्यावी, असे त्यांनी या निवदेनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments