पोरं…. आमच्याच जिल्ह्यातली,त्यामुळे कोणाला वेगळा न्याय नको…

2

मंगेश तळवणेकर; आवश्यक असल्यास क्वॉरंटाइन करा,पण त्यांनाही आणा

सावंतवाडी.ता,२७: गोव्यात अडकलेल्या मुलांना सिंधुदुर्गात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे,मात्र मुलींसह उर्वरित युवकांना सुध्दा जिल्ह्यात आणण्यासाठी सिंधुदुर्ग प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी आवश्यक असल्यास त्यांना क्वॉरंटाइन अट घालावी परंतू पोरं आपल्या जिल्ह्यातली असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय नको अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी केली.
दरम्यान याबाबत आपण जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांची चर्चा करू जे कोणी त्यांना जिल्हयात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी सर्वांचा विचार करावा असेही ते म्हणाले.मंगेश तळवणेकर यांनी ब्रेकिंग मालवणी ला संपर्क साधून आपली प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले या ठिकाणी कोरोनाच्या धर्तीवर गोव्यात बरीच मुले अडकले आहेत.प्रशासनाने मुलींना जिल्ह्यात आणण्यासाठी पावले उचलली आहेत,मात्र वस्तुस्थिती लक्षात घेतल्यानंतर गोव्यात अडकलेल्या मुलांकडे खाण्यासाठी अन्न नाही,पैसेही संपले आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांना प्रवेश देणे गरजेचे आहे आवश्यक असल्यास त्यांना घरातच क्वॉरंटाइन करा वेळ सांगून जिल्ह्यात बोलवा परंतु त्यांना आपल्या घरी परत येऊ द्या.असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आहे.

8

4