Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यागोव्यात अडकलेल्या त्या मुलांना अखेर सिंधुदुर्गात "एन्ट्री"

गोव्यात अडकलेल्या त्या मुलांना अखेर सिंधुदुर्गात “एन्ट्री”

दोडामार्ग
गोव्यात अडकलेल्या युवकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्यासाठी ब्रेकिंग मालवणी कडुन सुरु करण्यात आलेल्या प्रयत्नाला आज यश मिळाले.
त्याठिकाणी खासदार विनायक राऊत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नितेश राणे,आणी या सर्वांच्या प्रयत्नानंतर थोड्या थोड्या मुलांना जिल्ह्यात आणण्यात येणार आहे. यातील दोडामार्ग तालुक्यातील 35 मुलांना आज सकाळी तालुक्यात आणण्यात आले.
यासाठी येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी आदी सहका-यांनी प्रयत्न केले.
केंद्र शासनाच्या माध्यमातून अचानक जाऊन जाहीर करण्यात आलेल्या लाॅकडाउन मुळे ही मुले गोव्यात अडकली होती यात तब्बल दीड ते दोन हजार एवढी संख्या आहे मात्र प्रथमता त्या मुलांना देणार नाही अशी भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली होती परंतु वस्तुस्थिती वेगळी होती ती मुले ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी त्यांना फिरणे मुश्कील होते त्यांच्याकडे पैसे संपले होते धान्य संपले होते घर भाडे देण्यासाठी पैसे नव्हते ज्या कंपनीत काम करत होते त्यांनी हात वर केले होते त्यामुळे त्या मुलांनी आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतण्याची परवानगी द्या अशी मागणी केली होती या मागणीसाठी आमदार उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी काल झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स होते त्या मुलाला थोडी थोडी करून घ्या अशा सूचना दिल्या होत्या त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या मुलांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले आज 35 योग्य होती दोडामार्ग तालुक्यात सकाळी दाखल झाले आता अन्य तालुक्यातील मुलांना आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments