डिंगणे पोलीस पाटलांना अज्ञातांकडून मारहाण…

2

गोव्यात जाणार्‍या वाहनांना प्रवेश नाकारल्याच्या रागातून प्रकार; बांदा पोलीस ठाण्यात तक्रार…

बांदा.ता,२८:  बांद्यातून डिंगणे-गाळेल मार्गे गोव्यात जाणाऱ्या वाहनाना प्रवेश नाकारला म्हणुन डिंगणे पोलीस पाटील यशवंत राघोबा सावंत (वय ५८) यांना चार अज्ञात दुचाकीस्वारानी मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. या मारहाणीत सावंत याच्या हात फॅक्चर झाला आहे. ही घटना गुरूवारी रात्री साडे दहाच्या सुमारास गाळेल येथे घडली. याबाबतची तक्रार सावंत यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा बांदा पोलीसात दिली.
याबाबत बांदा पोलीसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर डिंगणे पोलीस पाटील सावंत हे गाळेल येथील रस्त्यावर गोव्यातुन येणाऱ्या व गोव्यात जाणाऱ्या गाडय़ाना थांबवुन विचारणा करीत होते. दरम्यान गोवा-वारखंड येथे जाण्यासाठी एक दुचाकीस्वार आला असता त्याला सावंत यांनी विचारणा करत परतवुन लावले. त्या नंतर त्याठिकाणी दोन दुचाकीस्वार आले. व त्यातील एका दुचाकीस्वाराने आपल्याला मारहाण केल्याचे सावंत यानी तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीनंतर त्यांना बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे पाठविले. सावंतवाडी येथील खाजगी दवाखान्यात उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असुन त्यात त्यांचा हात फॅक्चर झाला. याबाबत बांदा पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेड कॉस्टेबल दिलीप धुरी करीत आहेत.

5

4