Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या"लॉकडाऊन" गांभीर्याने घ्या,घराबाहेर पडल्यास कडक कारवाई करू....

“लॉकडाऊन” गांभीर्याने घ्या,घराबाहेर पडल्यास कडक कारवाई करू….

बांदा सरपंच अक्रम खान; दशक्रोशीतील जनतेला इशारा…

बांदा.ता,२८:  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र बांदा व दशक्रोशीतील जनता लॉकडाऊनला गांभीर्याने घेताना दिसत नाही. घराबाहेर न पडण्याचे आदेश असतानाही लोक बिनधास्तपणे फिरत असल्याचे निदर्शनास येत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस कडक पाऊले उचलून कारवाई करणार असल्याचा इशारा सरपंच अक्रम खान यांनी ‘ब्रेकिंग मालवणी’शी बोलताना दिला आहे.
महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शेजारील गोवा राज्यात देखील रुग्ण आढळल्याने सिंधुदुर्ग-गोवा सीमा सील करण्यात आली आहे. कोरोनाची टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे किट कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच रुग्णांची संख्या वाढल्यास याचा अतिरिक्त ताण आरोग्य यंत्रणेवर पडणार आहे. मात्र त्यासाठी जनतेने लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे.
गेल्या चार दिवसातील परिस्थिती पाहता लोक रस्त्यावर बिनदिक्कतपणे फिरत आहेत. यासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने कडक पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून रस्त्यावर विनाकारण कोणीही फिरताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा सरपंच खान यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments