सिंधुदुर्गात रक्तदान शिबिराचे आयोजन…

2

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा पुढाकार…

वेंगुर्ले.ता,२९:  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने आजपर्यंत अशा कठिण परिस्थिती प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत वेळोवेळी सामाजिक व राष्ट्रीय भावनेने आपले योगदान दिलेले आहे. सध्या महाराष्ट्र राज्यासह देशभरात तासातासाला COVID – 19 चा प्रादुर्भाव झालेल्या रूग्णांची संख्या वाढते आहे. अशा परिस्थितीत आपल्या राज्याला व देशाला या कठिण परिस्थितीचा सामना करता यावा यासाठी संघातर्फे जिल्हास्तरिय रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
आरोग्य विभाग, पोलिस विभाग, सार्वजनिक स्चछता विभाग इ. विभागाचे कर्मचारी या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मा.पंतप्रधान, मा.मुख्यमंत्री, मा. आरोग्यमंत्री डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचारी, मिडीया, सेलिब्रेटी, भविष्यातील धोका ओळखून वारंवार जनतेला सावधतेचे आवाहन करत आहेत. त्याअनुषंगाने उपरोक्त निर्णय संघाने घेतला आहे. शिबीराचे स्वरूप, दिनांक व इतर संबंधित बाबी आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून रक्तदात्यांना कळविल्या जातील. अखिल संघाच्या जास्तीत जास्त शिलेदार बंधू भगिनी यांनी रक्तदान शिबीरात रक्तदान करण्यासाठी पुढे यावे व नावनोंदणी करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष के.टी.चव्हाण सरचिटणीस गुरूदास कुबल व जिल्हा कार्यकारीणीने केले आहे.

4

4