कणकवली नगरपंचायतीकडून अत्यावश्यक साहित्य घरपोच पुरवण्यासाठी नियोजन…

2

समीर नलावडे; खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन…

कणकवली, ता.२८ : कोरोनाव्हायरस प्रादुर्भावामुळे 21 दिवसांचे लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर शहरातील नागरिकांनी अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी गर्दी करू नये यासाठी कणकवली यांच्यावतीने घरपोच साहित्य पुरवठा करण्याचे नियोजन केल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत ही सेवा सुरू असणार आहे. यासाठी कणकवली नगरपंचायत प्रभाग निहाय असलेल्या नगरसेवकांशी जनतेने व ग्राहकांनी संपर्क साधण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे. अत्यावश्यक घरपोच सेवेमध्ये 21 किराणा दुकानदार पाच दूध विक्रीचे 32 भाजीविक्रेते 34 फळविक्रेते व 11 कांदे-बटाटे विक्रेते ही घरपोच सेवा देणार आहेत. जनतेने या सेवेचा लाभ घेत गर्दी न करण्याचे आवाहन श्री. नलावडे यांनी केले आहे.

3

4