Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार एक दिवसाचे वेतन...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार एक दिवसाचे वेतन…

के.टी चव्हाण; अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा निर्णय..

वेंगुर्ले.ता,२८:  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ “कोरोना व्हायरस” या कठीण परीस्थितीत शासना बरोबर असून सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन राज्यातील सर्वया शिक्षक सभासद स्वेच्छेने एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणे बाबत निर्णय घेतला आहे.अशी माहीती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष कें.टी.चव्हाण यांनी दिली.
कोव्हीड -१९( कोरोना) विषाणूचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला असून शासन या जागतिक महामारीचा अतिशय नियोजनबद्ध रित्या सामना करत आहे. लोकांचे आरोग्याबरोबरच जीवनावश्यक गरजा पुर्ण करण्यासाठी शासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. त्यामुळे शिक्षक संघाने उपरोक्त निर्णय घेतला आहे. यापुढेही शासनास सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. माहे मार्च/ एप्रिल महिन्याच्या मासिक वेतनातून रक्कम देण्याबाबत पत्र मा. मुख्यमंत्री, मा.ग्रामविकासमंत्री व मा. शिक्षणमंत्री यांना राज्य अध्यक्ष देविदास बसवदे व सरचिटणीस कल्याण लवांडे यांच्या सहीचे पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्याबाबत नियोजन सुरू आहे. आमच्याकडून या संकटाचा सामना करण्यासाठी शासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments