मुख्यमंत्र्यांची माहिती;लाॅकडाउनच्या काळात फिरणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी निर्णय…
पणजी,ता.२८: “लॉकडाऊन” काळात उगाच राज्यात फिरणाऱ्यांना रोखण्यासाठी उद्यापासून गोव्यात सीआरपीएफ जवानांची फलटण तैनात करण्यात येणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान राज्यात सुरू करण्यात आलेल्या व्हायराॅलाॅजो लॅबचे टेस्टिंग घेण्यात आले असून उद्यापासून ती लोकांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.मात्र हा आजार अत्यंत घातक असून,अमेरिका इटलीसारख्या देशाला त्याचा फटका बसला आहे.त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये.
दूध,चिकन,आंबा आदी गोष्टी यानंतर सुध्दा आपण खाऊ शकतो.मात्र,अशा गोष्टींसाठी आपल्या कुटुंबाला अडचणीत आणू नये,असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.आपल्यावर राजीनामा द्या,अशी मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांन बाबत आपल्याला बोलायचे नाही.देश राज्य संकटात असताना अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण करणे,कोणाला शोभत नाही,यावर नंतर मी बोलेन,असे त्यांनी सांगितले.तसेच राज्यातील जनतेला सावरण्यासाठी वीज, पाणी बिल भरणे,सक्तीचे केलेले नाही.त्यावर तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे.कोणाचे नुकसान होऊ नये त्यासाठी त्यांना आर्थिक मदत देण्याच्या संदर्भात केंद्र शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.भुकेल्या लोकांना सदस्य अन्न देण्याचे काम गोव्यातील स्वयंसेवी मंडळी करत आहे.मात्र येत्या दोन दिवसात त्यांना थेट धान्य व जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात येतील,असे यावेळी त्यांनी सांगितले.



