बांदा शहरात ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशक फवारणी….

2

सावंतवाडी पालिकेचे सहकार्य;नगराध्यक्ष संजू परब यांचा पुढाकार…

बांदा.ता,२९:  कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने शहरात जंतूनाशक फवारणी करण्यात आली. यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी पाण्याचा बंब उपलब्ध करून दिला.
बांदा शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जंतूंनाशक फवारणी करण्याची मागणी स्थानिकांमधून होत होती. आज सकाळी कट्टा कॉर्नर चौकातून क्लोरीनयुक्त पाण्याची फवारणी सुरू करण्यात आली. संपूर्ण बांदा शहरात फवारणी करण्यात आली. गांधीचौक बाजारपेठेत बंब जाण्यासाठी अडचण येत असल्याने छोट्या गाडीतून फवारणी करण्यात येणार असल्याचे सरपंच अक्रम खान यांनी सांगितले.
यावेळी सरपंच खान यांच्यासह उपसरपंच हर्षद कामत, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, जावेद खतीब, साईप्रसाद काणेकर, राजेश विरनोडकर, उमांगी मयेकर, किशोरी बांदेकर, रिया आलमेडा आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

2

4