मालवण, ता. २९ : शहरात काल रात्री उशिरा दाखल झालेल्या मुंबईतील दोन पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन अशा एकूण पाच जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
सध्या संचारबंदी असून जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे असे असताना काल रात्री एका गाडीतून आलेल्या प्रवाशांना देऊळवाडा येथे पोलिसांनी रोखले. यात तपासणी केली असता मुंबईतील दोन पोलिस कर्मचारी तर कुटुंबातील अन्य तीन सदस्य असे पाच जण असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी तहसीलदारांचे लक्ष वेधण्यात आले. हे पाचहीजण मुंबईतून आल्याने त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.