वेंगुर्लेत शिवसेना पदाधिकारी राऊळ दाम्पत्याकडून मास्क व धान्य वाटप…

2

वेंगुर्ला: ता.२९: वेंगुर्ला शिवसेना तर्फे अत्यंत गरजू लोकांना शिवसेना शहर प्रमुख अजित राऊळ यांच्या कडून धान्य वाटप तर वेंगुर्ला न. प. च्या उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांच्यामार्फत येथील राऊळवाडा येथे मास्क वाटप करण्यात आले.

सध्या कोरोना ह्या जंतू संसर्ग रोगाने संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल असताना या होणाऱ्या मृत्यू तांडवाला थांबवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. यासाठी शासनाने आदेश दिल्याप्रमाणे सर्व नागरिकांनी घरी थांबणे अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान यावेळी ज्या मजूर कुटुंबियांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे अशा कुटुंबाना वेंगुर्ला शहर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख अजित राऊळ यांनी मोफत धान्य वाटप केले. तसेच अति महत्वाच्या कामासाठी व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडताना नागरिकांनी मास्क बांधणे गरजेचे असल्याने शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी तथा वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांच्यामार्फत येथील राऊळवाडा येथे मोफत मास्क वाटप करण्यात आले.

6

4