Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedदुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर..

दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर..

गोळवण- कुमामे येथील घटना…

मालवण, ता. २९ : वळणाच्या रस्त्यावर दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकीसह पुलाखाली पडल्याने उदय रघुवीर मेस्त्री (वय-२२) याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज दुपारी अडीच वाजता गोळवण- कुमामे येथे घडला.
या अपघाताची खबर वासुदेव पावसकर यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. संदीप घाडी हा आपल्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम. एच. ०७ ए. एच- ३३९० घेऊन गुरामवाडी ते गोळवन जात असताना कुमामे थांबा येथे उदय रघुवीर मेस्त्री याने त्याच्याकडे लिफ्ट मागितली. घाडी हा त्याला दुचाकीवरून घेऊन जात असताना कुमामे पुलनाजीकच्या रस्त्यावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि दोघेही दुचाकीसह पुलावरून खाली फेकले गेले. यात उदय मेस्त्री या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर संदीप घाडी हा गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अधिक तपास कट्टा पोलिस दुरक्षेत्राचे रुक्मागत मुंडे हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments