आमदार दीपक केसरकर नेमके “गायब” झाले कुठे..?

2

परशुराम उपरकरांचा सवाल; बाजापेटी वाटणारे आता सॅनिटायझर,मास्क वाटणार का..

कणकवली.ता,३०: राज्यात आणि देशात कोरोनाचे सावट असताना सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर मात्र गायब आहेत,अशी टीका मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केली. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर बाजापेटी व धान्य वाटप करणारे केसरकर आता मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यासाठी पुढाकार घेतील का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.श्री उपरकर यांनी आज या ठिकाणी ब्रेकिंग मालवणीला फोन द्वारे आपली प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले राज्यात आणि देशात कोरोनाचे संकट आहे.रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्ण मिळाला आहे.तर काहींना होम काॅरन्टाईन करावे लागले आहे,असे असताना सावंतवाडी मतदारसंघातून निवडून देण्यात आलेले आमदार तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सद्यस्थितीत आहेत.त्यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली आहे. गेले अनेक दिवस ते गपचूप आहेत.त्यामुळे ते नेमके गायब झाले की काय ? असा प्रश्न यावेळी उपरकर यांनी उपस्थित केला.दरम्‍यान निवडणूक असताना केसरकरांनी बाजा पेटया वाटल्या होत्या. धान्य वाटप केले होते.मग आता ते लोकांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करणार का असाही त्यांनी प्रश्न केला. लोकांचे आरोग्य लक्षात घेता त्यांना मूलभूत सुविधा देणे गरजेचे आहे. परंतु केसरकर नेमके गप्प का आहे.ते नाराज आहेत का?असाही चिमटा उपरकर यांनी काढला.

4

4