सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील आंबा उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून द्या…

2

 

आमदार  भाई गिरकर यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी…

मालवण, ता. ३० : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नगिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना आंबा विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेण्याची मागणी भाजपचे आमदार भाई गिरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मोठ्या प्रमाणात आंबा तयार झाला असून कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीमुळे कोकणातून मुंबई, पुणे, नाशिक व इतर महानगरामध्ये आंबा विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने तसेच निर्यात बंद असल्यामुळे एक कोटी आंब्याच्या पेट्या विक्रीविना पडून आहेत. आंबा हे नाशिवंत फळ असल्याने हे आंबे लवकर खराब होण्याची शक्यता निर्माण होणार आहे. आंबा साठवणूक करण्यासाठी अधिक प्रमाणात कोल्ड स्टोअरेज नसल्यामुळे तसेच मुबलक फळ प्रक्रिया केंद्र नसल्यामुळे देखील गैरसोय होत आहे. त्यामुळे कोकणातील छोट्या मोठ्या बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. आंबा बागायतदारांमध्ये निराशेची भावना निर्माण झाली आहे. तरी शासनाने तातडीने मोठ्या शहरात आंबा विक्री करता बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी आमदार श्री. गिरकर यांनी मुख्यमंत्री श्री.ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे केली आहे.

2

4