रोजंदारीवर काम करणाऱ्या ५६ मजुर कुटुंबियांना अन्नधान्याचे वितरण…

2

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले तालुक्यात भाजपाचा पुढाकार…

वेंगुर्ले,ता.३०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आज शहरात व ग्रामीण भागात रोजंदारी काम करणाऱ्या ५६ मजुर कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाचा सामना करताना जनसामान्यांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष मा.जगतप्रकाश नड्डा यांनी देशभरात पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन कोरोनामुळे ओढवलेल्या संकटात गरजूंना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन केले आहे. याच आवाहनाला प्रतीसाद म्हणून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने शहर व ग्रामीण भागातील कर्नाटक राज्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या ५६ कुटुंबांना तांदूळ , डाळ , कांदे बटाटे यासारखे अत्यावश्यक धान्य जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, परबवाडा सरपंच पपु परब, उपसरपंच संजय माळगावकर, सायमन आल्मेडा, प्रकाश धावडे, इशु फर्नांडिस, संतोष सावंत इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

1

4