कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांदा बाजारपेठ दोन दिवस बंद….

2

बांदा,ता.३०: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उद्या मंगळवार दिनांक ३१ मार्च व बुधवार दिनांक १ एप्रिल रोजी बांदा बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय बांदा व्यापारी संघ व ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून शहरातील मेडिकल स्टोअर्स वगळण्यात आले आहेत. सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन सरपंच अक्रम खान व दत्राप्रसाद पावसकर यांनी केले आहे.
आज सोमवार आठवडा बाजारात अनावश्यक व विनाकारण गर्दी करणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे दोन दिवस बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसात बांदा बाजारपेठ तसेच शहरात फिरताना कोणीही आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सरपंच अक्रम खान यांनी दिला आहे. दोन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्यासाठी सर्व व्यापारी बांधवांना आज सायंकाळी सूचना देण्यात आल्या आहेत.

1

4