सावंतवाडी बाजारपेठ उद्यापासून तीन दिवस पुर्णतः बंद…

2

व्यापारी संघटनेकडुन निर्णयःकोरोनाचा संंक्रमणाचा काळ असल्यामुळे घेतली भूमिका…

सावंतवाडी,ता.३०: येथील बाजारपेठ उद्यापासून २ तारखेपर्यंत पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय शहरातील व्यापार्‍यांनी घेतला आहे.कोरोना विषाणूचा येणाऱ्या काही दिवसात संक्रमणाचा काळ असल्यामुळे बाजारात होणारी गर्दी लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पालिकेकडुन संबधित व्यापार्‍यांना तसे पत्र देण्यात आले होते.
मात्र मुख्य बाजारपेठ बंद असली तरी शहरातील अंतर्गत भागात सुरू असलेली भाजीची तात्पुरती दुकाने सुरूच ठेवण्यात येणार आहे. तर ज्या नागरीकांना घरातील वस्तू आवश्यक असतील, त्यांनी व्यापार्‍यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना घरपोच ही सेवा देण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. नगराध्यक्ष संजू परब आणि व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची आज बैठक झाली यावेळी हा निर्णय घेतला.

1

4