गोव्यात अडकलेल्यांच्या मदतीसाठी युवासिंधु फाऊंडेशनचा पुढाकार…

2

धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा;सिंधुदुर्गातील दात्यांनी पुढे येण्याचे आवाहन…

सावंतवाडी ता.३१: लॉकडाऊन काळात गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील मुलांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी येथील युवासिंधू फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.दरम्यान त्याठिकाणी टप्प्या-टप्प्याने धान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा गोव्यातील काही सेवाभावी संस्थांच्या मदतीने सुरू आहे.याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते सागर नाणोसकर यांनी दिली.
ते म्हणाले,याठिकाणी काही दानशुरांकडून मदतीच्या स्वरूपात जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे काम फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत.व गोळा झालेले साहित्य टप्प्या-टप्प्याने गोव्याकडे पाठवून तेथील काही सेवाभावी संस्थांच्या मदतीने जिल्ह्यातील अडकलेल्या गरजू मुलामुलींना पुरविले जात आहे.दरम्यान अशा मुलामुलींना मदत द्यायची असल्यास किव्वा अडकलेल्या मुलांना मदत हवी असल्यास सागर सोमकांत नाणोसकर-९४२३३०९१६६,ओंकार सावंत-85540 45693,गुणाजी गावडे-94047 48518,मुन्ना आजगावकर-77981 83359,विनय वाडकर-96733 53240 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन युवासिंधु फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

1

4