गोव्यात अडकलेल्या मुलांना लाॅकडाउन काळात जिल्ह्यात आणणार नाही…

2

दीपक केसरकर; जिन्यावरून पडल्याने आजारी असल्यामुळे मतदारसंघात नसल्याचे म्हणणे…

सावंतवाडी,ता.३१:  गोव्यात अडकलेल्या मुला-मुलींना लाॅकडाउनच्या काळात जिल्ह्यात आणले जाणार नाही.जी ३४ मुले होती त्यांना स्पेशल बाब म्हणून घेण्यात आले, परंतु यापुढे कोणालाही आणले जाणार नाही. ती मुले ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, अशी भूमिका माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज स्पष्ट केली.
दरम्यान आपण जिन्यावरून पडल्याने गेले काही दिवस आजारी होतो. त्यामुळे मतदारसंघात नव्हतो. परंतु वय वर्ष ६०असताना व डायबिटीस प्रेशर असतानाही आपण लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत. त्यामुळे परशुराम उपरकर यांच्या टीकेला उत्तर द्यावे असे मला वाटत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.श्री.केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली, आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी केसरकर म्हणाले, आपण गेले काही दिवस  जिन्यावरून पडल्याने जखमी होतो, आजारी होतो. त्यामुळे मुंबईमध्ये थांबलो होतो. माझ्यावर टीका करणारे माजी आमदार परशुराम उपरकर हे सुद्धा गेली दोन वर्ष आजारी होते. मात्र, मी त्यांच्यावर कधीही टीका केली नाही. परंतु मी आजारी असताना माझ्यावर टीका करणे,त्यांना शोभत नाही. परंतु मी त्यांना काही उत्तर देणार नाही. ते पुढे म्हणाले, माझ्या आमदार निधीतून सावंतवाडी मतदार संघात आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी तब्बल ४७ लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्याच्यातून मास्क,सॅनिटीझर अशा आवश्यक वस्तू खरेदी केले जाणार आहे. त्या लवकरच लोकांपर्यंत पोहोचले जातील. आरोग्य सुविधा तसेच स्वच्छता सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा खाजगी वैद्यकीय सेवा करणाऱ्या लोकांना आवश्यक असलेले गणवेश उपलब्ध करून दिले जाणार आहेत.ते पुढे म्हणाले, गोव्यात अडकलेल्या मुलांना मदत मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत तसे आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु त्या मुलांना आता लॉकडाऊन च्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतले जाणार नाही.तर त्या ठिकाणी त्यांना आवश्यक सुविधा पुरवल्या जाणार आहे. त्यासाठी त्यांनी ९८२२३२१७९२ या नंबर वर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, व आपली नावे त्यांच्या व्हाट्सअप वर द्यावी, जेणेकरून अडकलेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करणे सोयीचे होईल.

2

4