एक एप्रिल दिवशी “नो एप्रिल फूल”…

2

जिल्हा पोलीस अधिक्षकांचे आवाहन;सोशल मीडियावर अशी पोस्ट व्हायरल झाल्यास ग्रुप एडमिनवर गुन्हा…

सिंधुदुर्गनगरी ता.३१: येत्या १ एप्रिल २०२० रोजी बरेच लोक आपले मित्र परिवार, स्वकीय व नातेवाईक यांना एप्रिल फूल करून एक वेगळा आनंद मिळवत असतात. देशातील कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेतला जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण होईल असे कोणतेही संदेश, छायाचित्रे किंवा व्हीडिओ एप्रिल फूल म्हणून सोशलमीडियावर पसरवू नयेत,असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी केले आहे.
अशा प्रकारे आपण केलेल्या किरकोळ चुकीमुळे जनमाणसामध्ये गैरसमज निर्माण होऊन, त्यांच्याकडून संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता असून त्यामुळे पोलीस दल तसेच जिल्हा प्रशासनावर अतिरिक्त ताण निर्माण होऊ शकतो. तरी सर्व सुज्ञ नाकरिकांनी अशी कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
जर अशा स्वरुपाचे संदेश, छायाचित्रे किंवा व्हीडिओग्राफी सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या, तर व्हायरल करणाऱ्या व ग्रुप ॲडमिन विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 140, भारतीय दंड विधान संहिता कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. तरी खबरदारी म्हणून ग्रुप ॲडमिनने आत्ताच आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना सुचना द्याव्यात व सेटिंगमध्ये फक्त ग्रुप ॲडमिन मेसेज सेंड करेल असे सेटिंग करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

9

4