सिंधुदुर्ग बाल संरक्षण कक्षात दोन पदांसाठी भरती प्रक्रिया…

2

सिंधुदुर्गनगरी ता.३१: महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या अधिनस्त जिल्हा बाल संरक्षण कक्षामध्ये दोन पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.यासाठई इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
कयदा व परिविक्षा अधिकारी व डेटा विश्लेषक या दोन पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कायदा व परिविक्षा अधिकारी या पदासाठी मासिक मानधन 21 हजार रुपये असून शैक्षणिक पात्रता व अनुभव पुढील प्रमाणे आहे. विधी क्षेत्रात पदवी, समाजकार्याचा अनुभव, मोफत विधी सेवा म्हणून काम करण्याचा 2 वर्षांचा अनुभव, व्यवस्थापक कौशल्य, समस्य, सुत्रिकरण, अहवाल लेखन, वालकाच्या कायद्याबाबत ज्ञान असणारा, नियोजन, समन्वय, जनसंपर्क कौशल्य व मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक, संगणकाचे ज्ञान असावे. तर डेटा विश्लेषक पदासाठी 14 हजार रुपये मासिक मानधन आहे. यासाठई साख्यिकी शास्त्र, सामाजिकशास्त्र, गणित यापैकी एकाविषयात पदवी, लेखामध्ये 1 वर्षाचा अनुभव, एम.एस.सी.टी. एम.एस. ऑफिसचे ज्ञान व मराठी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असे शैक्षणिक व अनुभवाच्या अटी आहेत.
तरी इच्छुक उमेदवारंनी आपले अर्ज दिनांक 30 एप्रिल 2020 रोजीपर्यंत जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे टपालाद्वारे किंवा dwcdsindh@rediffmail.com येथे ऑनलाईन सादर करावेत असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

13

4