अडकलेल्या नागरिकांनी आहात तिथेच सुरक्षित राहावे…

2

रुपेश राऊळ;आडमार्गाने येणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता…

सावंतवाडी,ता.३१:  गोव्यासह पुणे,मुंबई येथे अडकलेल्या नागरिकांनी जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करू नये, त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही आहात तेथेच सुरक्षित रहा, असे आवाहन सावंतवाडी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे.
कोरोनाच्या काळात आरोग्य व पोलिस प्रशासन जिल्ह्यात योग्य पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे कोणाच्या तरी आडमार्गाने येण्याने त्यांच्या कामात अडचण निर्माण होऊ नये याची सर्वानींच दक्षता घ्यावी, असेही राऊळ म्हणाले.

3

4