उज्वला गॅसच्या तीन सिलिंडरचे पैसे थेट खात्यात जमा….

2

मथुरा वैद्य; लॉकडाउन काळात ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील

सावंतवाडी.ता,३१: लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील सर्व घरगुती गॅस धारकांना मागणीनुसार गॅस पुरवठा होणार आहे. त्यामुळे कोणी गॅस खरेदीसाठी गर्दी करू नये. उज्वला योजनेतील गॅसधारकांना तीन एप्रिल पासून सिलिंडर वितरित करण्यात येणार आहे.त्याची आगाऊ रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे,अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नोडल अधिकारी मथूरा वैद्य यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून घरोघरी गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच लाखाचा अधिकचा विमा काढण्यात आला आहे.तसेच ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेता घरोघरी देण्यात येणारे गॅस सिलिंडर सॅनिटायीझ करून आलेले असतात.त्यामुळे कोणीही काळजी करू नये असेही वैद्य यांनी सांगितले.
गॅस बाबत पुरवठा करण्यासंदर्भात वैद्य यांनी माहिती दीली.ते म्हणाले उज्वला योजनेअंतर्गत पन्नास हजार सातशे सत्तेचाळीस लोकांना जिल्ह्यात लाभ देण्यात येणार आहे.संबंधित ग्राहकांना हा तीन महिने एल पी जी सिलिंडर मोफत देण्यात येणार असला तरी त्याचे पैसे तीन तारखेला ग्राहकाच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत.गॅस खरेदी करताना संबंधित दुकानदाराला किंवा एजन्सी चालकाला पैसे देणे बंधनकारक राहणार आहेत.
वैद्य पुढे म्हणाले जरी लॉकडाऊन चा कालावधी २१ दिवसाचा असला,तरी आमच्या ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी मुबलक साठा आमच्याकडे आहे. त्यामुळे कोणीही सिलींडर साठी दुकानावर किंवा गोडाऊनमध्ये गर्दी करू नये ऑनलाइन मागणी केल्यानंतर घरपोच डिलिव्हरी देण्याची जबाबदारी आमची आहे. मात्र दुसरा सिलेंडर बुक करताना त्यात पंधरा दिवसाचा कालावधी जाणे अपेक्षित आहे.त्यामुळे या सर्व बाबींसाठी ग्राहकांनी सर्व गॅस कंपन्यांना सहकार्य करावे.

4

4