बांदा ता.०१: शहरात आज जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाने संचारबंदी आणखीनच कडक करण्यात आली.पोलिसांनी मुख्य कट्टा कॉर्नर चौकात बॅरिकेट्स लावून बाजारपेठेत येणारा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरी भागात दुचाकी फिरण्यास बंदी आदेश काढला आहे. यामधून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी आजपासून बांदा शहरात करण्यात आली.
सकाळीच हॉस्पिटल कट्टा येथे बॅरिकेट्स लावून पोलिसांनी शहरात येणारी वाहतूक रोखली आहे. यावेळी विनाकारण शहरात फिरणाऱ्या दुचाकी चालकांना पोलिसी हिसका दाखविण्यात आला. पोलीस कारवाईमुळे शहरात तुरळक वाहतूक होती. संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने शहरात शुकशुकाट होता. पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
बांदा शहरात कडक पोलीस बंदोबस्त; बाजारपेठेतील रस्ता बंद…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES