तालुकास्तरावर “शिवभोजन” केंद्र सुरू…

2

 

दादासाहेब गिते; एकूण ७५०शिवभोजन थाळी देणार…

सिंधुदुर्गनगरी ता.०१: कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन केला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित,बाहेरगावचे विद्यार्थी, वेघर यांचे जेवणा अभावी हाल होऊ नयेत या अनुषंगाने तालुकास्तरावर तातडीने शिवभोजनाच्या माध्यमातून या लोकांच्या जेवणाची सोय करण्यात येत आहे. जिल्ह्यातही या दृष्टीने तालुका स्तरावर शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रावर आता ५ रुपये दराने शिवभोजन उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले.
जिल्हा मुख्यालय येथे यापूर्वीच 150 थाळी पुरवणारी दोन शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तर जिल्ह्यातील नव्याने सुरू करण्यात आलेली शिवभोजन केंद्राची तालुका निहाय यादी पुढील प्रमाणे आहे. शिवभोजन केंद्राचे नाव, तालुका व मिळणाऱ्या थाळींची संख्या अनुक्रमे विघ्नेश हॉटेल सावंतवाडी, तहसिलदार कार्यालयाजवळ, 100 थाळी. संकल्प स्वयंसहाय्यत समुहा कॅन्टीन, तहसिलदार कार्यालय कॅन्टीन, 50 थाळी.  स्वाधार लोकसंचालित साधन केंद्र, बाजारपेठ कुडाळ, 50 थाळी. पुर्णांन्न किचन शिवभोजनालय, हिरकरणी लोकसंचलिक साधन केंद्र, व संजीवणी महिला बचक गट, कणकवली बाजारपेठ, कणकवली, 100 थाळी. श्री. स्वयंसहाय्यता महिला बटत गट, देऊळवाडा, हॉटेल स्वाद, श्रीकृष्ण बिल्डींग, मेढा, मालवण, 100 थाळी. हॉटेल संडे कॉर्नस ॲँड कॅटरर्स, वेंगुर्ला, 50 थाळी. गुरुमाऊली भोजनालय, जामसंडे बाजारपेठ, देवगड, 50 थाळी. राव हॉटेल, विजयदुर्ग – कोल्हापूर रस्त्यालगत, वैभववाडी, 50 थाळी. चैत्यन्य प्रशिक्षण संस्था, कसई, दोडामार्ग, 50 थाळी अशा एकूण आठ ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. सर्व शिवभोजन केंद्रांवर मिळणून 750 थाळी मिळणार आहेत.

6

4