गाड्या जप्तीच्या कारवाईमुळे, व्यावसायिकांकडून दूध न मागवण्याचा निर्णय…
सावंतवाडी,ता.०१: संचारबंदीचे कारण पुढे करून अनेक दूध विक्री करणा-या व्यावसायिकांच्या गाड्या अडविण्या बरोबर काहींच्या गाड्या जप्त करण्यात आल्यामुळे सावंतवाडी शहरात उद्या दूधपुरवठा बंद करण्याचा निर्णय व्यावसायिकांकडून घेण्यात आला आहे.याबाबत त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून येथील तहसीलदार कार्यालयात त्यांनी आपली हजेरी लावली.
यावेळी आम्ही आवश्यक सुविधा पुरवत असताना पोलिसांकडून जर गाड्या जप्त करण्यात येत असतील,तर ते योग्य नाही.त्यामुळे आता आम्ही दूध पुरवठा करायचा कसा ?,असा प्रश्न करीत उद्या दूध मागवलेले नाही,असा इशारा दूध विक्रेत्यांकडून देण्यात आला आहे.आज त्यांनी कारवाई
झाल्यानंतर येथील तहसीलदार कार्यालयात धाव घेतली.चुकीच्या पद्धतीने पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.त्यामुळे आम्ही सेवा पुरवायची कशी,असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.