दुध पुरवठा व्यावसायिक आणी प्रशासन यांच्यात समझोता…

2

तहसीलदारांची मध्यस्थी;उदया दुध वितरित करण्याची विक्रेत्यांची हमी…

सावंतवाडी,ता.०१:  शहरात दूध विक्री करणारे व्यावसायिक आणि प्रशासन यांच्यात अखेर यशस्वी समझोता झाला आहे.त्यामुळे उद्यापासून दूध पुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन संबंधित व्यावसायिकांनी दिले आहे.याबाबतची माहीती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.
आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर दूध पुरवठा करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी अडवले होते. तसेच काहींच्या गाड्या जप्त केल्या त्यामुळे आमच्यावर कारवाई झाल्यामुळे उद्या दूध मागवणार नाही, अशी भूमिका घेतली होती.परंतु या बाबतची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदारांनी त्या सर्व व्यावसायिकांशी चर्चा केली, त्यांची मागणी मान्य केली. व उद्यापासून दूध पुरवठा सुरळीत करण्याच्या सुचना दिल्या.

5

4