जीवनावश्यक वस्तू घेऊन आज गाडी गोव्याकडे रवाना…

2

अडकलेल्या मुलांसाठी भाजप धावली; ६१९ हून अधिक गरजूंना मिळणार लाभ…

सावंतवाडी,ता.०१:  गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कडून देण्यात येणारी मदत आज दुपारी गोव्याकडे रवाना झाली. यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व राजन तेली व त्यांच्या सहकार्यानी विशेष परिश्रम घेतले. यासाठी ब्रेकिंग मालवणीने आवश्यक असलेले नंबर त्यांच्याकडे उपलब्ध करून दिले होते. दरम्यान त्या मुलांना पाठविण्यात आलेले साहित्य गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत वितरित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी हे साहित्य सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
गोव्यात अडकलेल्या मुलांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्यासाठी भाजपकडून प्रयत्न झाले, परंतु केंद्र स्तरावरून आवश्यक ती परवानगी न मिळाल्यामुळे ती मुले ज्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी त्यांना जीवनाश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जोरदार प्रयत्न केले. यासाठी ब्रेकिंग मालवणी कडून पाठपुरावा करण्यात आला. प्रशासनाकडे दिलेल्या यादीप्रमाणे थेट गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. ही गाडी आज दुपारी गोव्याच्या दिशेने रवाना झाली तब्बल ५७० हून अधिक लोकांना हे साहित्य वाटप करण्यात येणार आहे, असे तेली यांच्याकडून सांगण्यात आले यावी. भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

0

4