शहरानंतर आता ग्रामीण भागात सुद्धा दुचाकीवर बंदी…

2

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी नियोजन करणार…

ओरोस ता.०१: 
कोरोना प्रसाराच्या प्रतिबंधासाठी उपाय योजना म्हणून जिल्ह्याच्या नागरी भागात 1 एप्रिल पासून दुचाकी बंदी घातली आहे. आता ही बंदी ग्रामीण भागात सुद्धा घालणार आहोत. यापूर्वी जिल्ह्याच्या शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सेवा देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली.
यावेळी बोलताना मंजुलक्ष्मी यांनी दुचाकी बंदीचा आज पहिला दिवस होता. त्यामुळे काही त्रुटी राहिल्या असतील. पण या त्रुटी दूर करून उद्यापासून दुचाकी बंदी अजुन कडक करण्यात येणार आहे. नागरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा दुचाकी बंदी करण्यात येणार आहे. यासाठी नगर पंचायत प्रमाणे ग्राम पंचायतींना आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सेवा देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर जिल्हा परिषद स्तरावर त्याचे नियोजन करीत आहेत. हे नियोजन पूर्ण झाल्यावर ग्रामीण भागात सुद्धा दुचाकी बंदी करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.

1

4